ब्लॉगविषयी थोडेसे..

भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानाचे अपरिमीत भांडार आहे. त्या ज्ञानसागरात डुबकी मारली कि अनंत रत्ने हाताला लागतात. आपल्या ऋषीमुनींनी योगाभ्यासाने प्राप्त केलेले विश्वाच्या अस्तित्वाचे ज्ञान अर्थात अध्यात्म आपल्याकडील विपुल ग्रंथांत संकलित केले आहे. माझ्या पीएचडीच्या प्रवासात यातील काही ग्रंथ वाचण्याचे आणि अभ्यासण्याचे भाग्य मला लाभले. त्या अभ्यासातून मला उमजलेल्या अध्यात्मातील काही निवडक संकल्पना लोकांपर्यंत पोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न!